शिरवल गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – संदेश उर्फ गोटया सावंत 

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

शिरवल गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – संदेश उर्फ गोटया सावंत 

विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; शिरवल गाव राणे कुटुंबीयांचा बालेकिल्ला

शिरवल गाव हा राणे साहेबांच्या विचारांना मानणारा गाव आहे.शिरवल ग्रामस्थ आणि कार्यकर्ते नेहमीच राणे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे राहिले आहेत.या गावातील ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणेंना भरघोस मतदान करुन गावातून सर्वाधिक मताधिक्य दिले आहे.. त्यामुळे राणे कुटुंबीयांचा आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला अशी विशेष ओळख शिरवल गावाची बनली आहे.त्यामुळे शिरवल गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असुन खास.नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करणार आहोत..असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी शिरवल येथे केले.

यावेळी शिरवल मुख्य रस्ता ते चव्हाणवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत या रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला.

यावेळी भाजप ओबीसी सेलचे कणकवली तालुकाध्यक्ष पंढरी शिरवलकर ,उद्योजक संजय चव्हाण
ग्रामपंचायत सदस्य सूचित गुरव
भाजप अनु. जातीचे जिल्हा चिटणीस राजेंद्र चव्हाण
भाजप मंडल अध्यक्ष अजित तांबे,
अनिल चव्हाण, अशोक चव्हाण, सदाशिव चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, सचिन चव्हाण, सुभाष चव्हाण संजय चव्हाण, संदीप चव्हाण, ज्ञानेश्वर शिरसाट, पांडुरंग सावंत, अनिता चव्हाण, रोशनी चव्हाण, शुभम चव्हाण योगेश चव्हाण.आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना संदेश उर्फ गोटया सावंत म्हणाले की,शिरवल गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.खा.राणे आणि पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून विकासकामासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.अशी ग्वाही यावेळी सावंत यांनी दिली.

शिरवल गावातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांघिकपणे संघटना वाढीसाठी एकदिलाने काम करत आहेत. हि बाब पक्षसंघटना वाढीसाठी कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार सावंत यांनी काढले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *