कळसुलीत श्री. स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी प्रकट दिन सोहळा ;  विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन 

0 minutes, 3 seconds Read

 

कणकवली ( प्रतिनिधी)

 

 

 

कळसुलीत श्री. स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी प्रकट दिन सोहळा ;  विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन 

 

 

 

प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी (रजि.) सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.स्वामी मठात प्रकट दिन उत्सव सोमवार ३१मार्च रोजी श्री.स्वामी समर्थ मठ कळसुली (हर्डी) येथे साजरा होणार आहे.श्री. स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम खालील प्रकारे सकाळी ४ ते ६ वाजता काकड आरती,७.३० ते १०.३० वाजता पुण्यावाचन अभिषेक, होम हवन, स्वामींची पादुका पूजन,११ वाजता श्री. सत्य नारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १ ते २.३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता श्री. स्वामी समर्थ चरित्र सामुहिक पठण, ३.३० ते ५.३० वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक, नृत्य कार्यक्रम, सायं.६ वाजता पालखी मिरवणूक, सायं.७ वाजता हरिपाठ, रात्रौ.८ वाजता कीर्तन ह.भ.प. बुवा पुरूषोत्तम यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्रौ.९वाजता स्थानिक सुस्वर भजने आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

 

तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी (रजि.) सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांनी केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *