बांदा ग्रामस्थ आक्रमक; तीव्र नाराजी, दोन दिवसात शहर सोडण्याचा इशारा..

0 minutes, 1 second Read

 

 

बांदा (प्रतिनिधी)

बांदा ग्रामस्थ आक्रमक; तीव्र नाराजी, दोन दिवसात शहर सोडण्याचा इशारा..

फुलावर मारण्यात येणाऱ्या पाण्यात भुंकणाऱ्या मौलवीच्या विरोधात आज बांदा ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधिताने दोन दिवसात बांदा सोडावे, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी त्याला दिला आहे.

 

शहरातील एका फुलाच्या दुकानात असलेल्या पाण्यात तो भुंकत असताना तेथील हिंदू एकता मंचच्या युवकांनी त्याला पाहिले. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. ही घटना आज सकाळी घडली. आपण अडचणीत येऊ नये म्हणून संबंधित मौलवीने माफी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. या प्रकारात विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान मौलाना हा बिहार येथील असल्याचे आधारकार्डवरून निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी हस्ताक्षेप केल्याने तणावं निवळला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने जोपर्यंत पुढील कारवाई होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *