कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली नगरपंचायतकडून रंगीत तालीम…
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश असून या 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज दिनांक 07/05/2025 रोजी दुपारी 4.00 वाजता नागरी संरक्षक दल यांचे मार्फत देशभरात नागरी संरक्षणाच्या अनुषंगाने रंगीत तालीम आजोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
