केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरात 3 मे रोजी धार्मिक कार्यक्रम
पाडलोस केणीवाडा येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिरात शनिवार 3 रोजी दुपारी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 7 वा. वाडीतील लहान व मोठ्या मुलांच्या वेशभूषा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ पाडलोस-केणीवाडा व सर्व ग्रामस्थांनी केले आहे.