लाखेवस्तीत नव्याने 25 घरे द्या,मंत्री केसरकर यांना दिल्या निवेदन

0 minutes, 0 seconds Read

लाखेवस्तीत नव्याने 25 घरे द्या,मंत्री केसरकर यांना दिल्या निवेदन

सावंतवाडी – प्रतिनिधी ५ ऑगस्ट २०२४

 

सावंतवाडी जिमखाना येथील लाखे वस्ती समाजाकडून 25 घरांसाठी केली मागणी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, व सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी, यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
लाखेवस्तीमध्ये, राखीव जागेत 25 घरांची मागणी, गेले 15 वर्ष वस्तीतील लोक करत आहेत, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे, लाखेवस्तीमध्ये एका कुटुंबामध्ये दोन कुटुंबापेक्षा अधिक लोक राहत आहेत,.राहत्या घरामध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून पावसाळ्यामध्ये घरांच्या सिलिंग मधून पावसाच्या पाण्याचे गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे.यामुळे घरामध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे.वेळोवेळी नगरपालिकेकडून आश्वासने देण्यात आली होती परंतु अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही.स्वतः शालेय मंत्री दीपक भाई केसरकर साहेब, यांनी स्वतः येऊन पाहणी केली आहे.लाखे वस्ती समाजाकडून शालेय मंत्री दीपक भाई केसरकर साहेब यांना निवेदन देण्यात आले, तेव्हा केसरकर यांनी नगरपालिका मुख्याधिकारी याना सदर 25 घरांसाठी आदेश देण्यात आले आहेत असे सांगितले आहे.
घरांच्या मागणी साठी निवेदन देताना असताना लाखे वस्ती समाजातील व श्री रासाई कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा जगन्नाथ लाखे
सुनील लाखे, संजय खोरागडे, अंकुश लाखे, रोहित लाखे, नितेश पाटील,सागर लाखे, राम लाखे, साई लाखे, लखन पाटील, पवन पाटील, धीरज लाखे, प्रभू पाटील, विकी लाखे, अविनाश खोरागडे हे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *