कणकवली (प्रतिनिधी)
उबाठा शिवसेनेला जोरदार धक्का ; अँड प्रसाद करंदीकर आपल्या कार्यकर्त्यांसहित भाजपात दाखल ; आता धालवली, पोंभुर्ले, मालपे कोर्ले गावांवर भाजपाची मजबुत पकड
उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख व लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांचेसह पोंभुर्ले सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
पोंभुर्लेतील सोसायटीचे पदाधिकारीही भाजपमध्ये
* धालवली, पोंभुर्ले, मालपे गावांमध्ये भाजपाचे वर्चस्व, उबाठा झाली खालसा
लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष व उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख अॅड. प्रसाद करंदीकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला.
अॅड. प्रसाद करंदीकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पडेल विभाग विजयदुर्ग परिसरात भाजपाचे प्राबल्य वाढले आहे. करंदीकर यांच्या प्रवेशामुळे कोरला, धालवली, पोंभुर्ले आणि मालपे,मणचे या गावांमधील स्थानिक राजकारणात भाजपाची पकड बळकट झाली असून, उबाठा सेना संपली आहे.
त्यांच्यासमवेत पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, उदय बावकर, मयुरी कांबळे, नितीन तेरवणकर, नैमुना शिरगावकर, सपना फाळके, राजश्री धुमाळ, पूजा समजिसकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
