मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही ; उर्वरित निधी न मिळाल्यास लाभार्थी बसणार पं .स कार्यालय येथे १५ ऑगस्टला उपोषणाला

0 minutes, 1 second Read

 

देवगड (स्वप्नील लोके) २ जुलै २०२४

 

 

मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही ; उर्वरित निधी न मिळाल्यास लाभार्थी बसणार पं .स कार्यालय येथे १५ ऑगस्टला उपोषणाला

 

 

देवगड तालुक्यातील मोदी आवास योजनेच्या १५७ लाभार्थ्यापैकी त्यातील फक्त ७ ते ८ लाभार्थ्यांनाच १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला परंतू त्यातील काही लाभार्थांना घरकुल पुर्ण करूनही निधीची पुर्तता करण्यात आली नाही. निधीची तरतुद नसेल तर अशा फसव्या योजना जाहीर का करता ?गरीबांना मोफत घरे देतो अशी चमकेगीरी करून निवडणुकीच्या तोंडावर मते मिळविण्याचा हा एककलमी कार्यक्रम आहे का?असा उद्विग्न सवाल देवगड तालुक्यातील मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्यासमोर केला. लाभार्थ्यांना निधीची पुर्तता न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यादिनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा लाभार्थ्यांनी यावेळी दिला. राज्यशासनाकडून निधी आला नसल्यामुळे लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यात आला नाही.निधी प्राप्त होताच देण्यात येईल असे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी सांगीतले.

देवगड तालुक्यातील मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी शुक्रवारी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेवून घरकुल पुर्ण होवूनही लाभार्थ्यांना निधीची पुर्तता करण्यात आली नाही.निधी मिळेल तुम्ही घराचे काम पुर्ण करा असा फोर्स करण्यात आला. लाभार्थ्यांनी उसने पैसे घेवून घरांचे काम पुर्ण केले मात्र शासनाकडून निधीची पुर्तता न केल्याने लाभार्थी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.एकूण मंजूर लाभार्थ्यांपैकी घरे मुदतीत पुर्ण करूनही अपुरी मदत देवून आर्थिक दुर्बल घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याची व त्यांची फसवणुक करण्याचे काम शासनाने केले आहे अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या.

योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जबाजारी करून आत्महत्येस प्रवृत्त करीत आहात असा गंभीर आरोप लाभार्थ्यांनी यावेळी केला.देवगड तालुक्यात योजनेचे १५७ लाभार्थी असून त्यातील फक्त ७ ते ८ लाभार्थ्यांना १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला.परंतू अशा कित्येक लाभार्थ्यांना घरकुल पुर्ण होवूनही निधीची पुर्तता करण्यात अपयशी शासन अपयशी ठरले आहे. निधीची तरतुद नसेल तर अशा फसव्या योजना शासन जाहीर का करते?फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांची फसवणुक करून गरीबांना मोफत घरे देतो अशी चमकेगीरी करून मते मिळवायची हा एक कलमी कार्यक्रम राबविला जात आहे अशा शब्दात लाभार्थ्यांनी उद्विग्नता व्यक्त केली.या योजनेत लाभार्थ्यांची फसवणुक झाली असून उर्वरीत निधीची पुर्तता न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी पं.स. कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपस्थित लाभार्थ्यांनी दिला.याबाबतचे २६ लाभार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना देण्यात आले.यावेळी दत्ताराम उर्फ बाळा कोयंडे, सिताराम कोयंडे, रामचंद्र त्रिबंककर, भाऊ चिंदरकर, विजया बापर्डेकर, नंदकिशोर खोत, शिवराम जोशी, निळकंठ खोत, किरण हिंदळेकर, विशाखा मयेकर, अभय पराडकर आदी लाभार्थी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *