कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल 

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल 

 

 

 

तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही

कणकवली शहरात महापुरुष काॅम्प्लेक्स च्या एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.काळा टी शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा.अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मात्र सदर तरुणाची ओळख पटली नसून या तरुणाची आत्महत्या, घातपात की कसे याची उलट सुलट यांची चर्चा आता सुरु झाली आहे.मात्र पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात नसावा.अशी माहिती दिली आहे.हि घटना दुपारी उघडकीस आली.पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक शरद देठे , महेश शेडगे, दाजी सावंत, पांडुरंग पांढरे, भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *