बांदा येथे गुरुवारी रात्री पारंपारिक होळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला.श्री बांदेश्वर मंदिर नजीकच्या होळीचा खुंट या जागेवर होऴी उभी केल्यानंतर धार्मिक विधीनंतर ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे आपले वार्षिक नारळ तसेच नवसाची तोरणे आदि अर्पण केले . श्री बांदेश्वर भूमिका पंचायतनातील सर्व मंदिरांच्या समोर होलिका पूजन विधि झाल्यानंतर होळीचा खुंट येथील मुख्य होळीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेप्रमाणे होळीपासुन शिमगोत्सव आरंभ झाला असुन पंधरा दिवसांनी गुरुवारी दि. 27 मार्च रोजी बांद्याची रंगपंचमी होणार आहे