आचरा-अर्जुन बापर्डेकर
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशीचा महिला गौरव पुरस्कार मिताली कोरगावकर यांना जाहीर
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,आचरे पंचक्रोशी (फेस्कॉम संलग्न) महिला गौरव पुरस्कार आचरे पिरावाडी येथील उद्योजिका मिताली प्रशांत कोरगावकर यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण २० मार्च २०२५ रोजी संघाच्या वार्षिक मेळाव्यात सकाळ सत्रात लौकिक सांस्कृतिक सभागृह (हॉटेल सिरॉक), आचरे येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी असून प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. सुभाष दिघे, मालवण हे उपस्थित राहणार आहेत. श्रीम. कोरगावकर या उद्योजिका असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत.
