अटीशर्तीला अधिन राहून ठरावाला मंजूरी ; फणसगावसहीत सात गावांना हवा आहे कोर्ले सातंडी प्रस्तावित नळयोजनेच्या विहीरीवरून पाणी ; यासाठी पाहिजे होता न.पं.चा ठराव
अटीशर्तीला अधिन राहून ठरावाला मंजूरी ; फणसगावसहीत सात गावांना हवा आहे कोर्ले सातंडी प्रस्तावित नळयोजनेच्या विहीरीवरून पाणी ; यासाठी पाहिजे होता न.पं.चा ठराव
विशेष सभेत यावर झाली खरपुस चर्चा ; पाणी देणार मात्र अटीशर्तीला अधिन राहून
त्या सात गावांना विहीरीवरून पाणी देण्यास परवागनी देताना न.पं.च्या अटीशर्तीना अधिन राहून ठराव देण्यास न.पं.च्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली.फणसगावसह सात गावांना देवगड जामसंडेसाठी कोर्ले सातंडी धरणावरून प्रस्तावित केलेल्या स्वतंत्र नळयोजनेच्या विहीरीवरून पाण्याचा वापर करण्यास परवानगी द्यावी असा ठराव न.पं.ने द्यावा यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत उपस्थित सर्व नगरसेवकांनी चर्चेअंती ठरावास मान्यता दिली मात्र स्वतंत्र नळयोजना असूनही इतर ९ गावे असल्याने देवगड जामसंडेवासियांना पाडाघर नळयोजनेवरून पाणीपुरवठा होत नाही याकडेही लक्ष वेधले.नगरसेवक नितीन बांदेकर आणि बुवा तारी यांनी मागील आलेले कटू अनुभव लक्षात घेवूनच ठरावाला मान्यता द्या असे मत मांडले तर बांदेकर यांनी नवीन योजना काळाची गरज आहे मात्र सध्या योजनेवरून पाणीपुरवठा होत आहे ती सक्षम करा याकडेही लक्ष वेधले.
देवगड जामसंडे न.पं.ची विशेष सभा न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, बांधकाम सभापती शरद ठुकरूल, पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने, स्वच्छता सभापती सौ.आद्या गुमास्ते उपस्थित होत्या.
देवगड जामसंडेसाठी कोर्लेे सातंडी धरणावरून प्रस्तावित केलेल्या नळयोजनेच्या विहीरीवरून तेथिल विठ्ठलादेवी, बुरंबावडे, उंडील, फणसगाव, पोंभुर्ले, कुणकवण, वाघिवरे या सात गावांना पाण्याचा वापर करण्यास परवानगी द्या असा ठराव देवगड जामसंडे न.पं.ने द्यावा हा विषय या सभेसमोर होता.या सभेत यावर खुप चर्चा झाली.उपस्थित नगरसेवक नितीन बांदेकर व बुवा तारी यांनी मागील कटू अनुभव लक्षात घेवून निर्णय घ्यावा असे सुचित केले.कारण देवगड जामसंडेवासियांसाठी शिरगाव पाडाघर येथून स्वतंत्र नळयोजना तत्कालीन आमदार आप्पासाहेब गोगटे यांनी निर्माण केली मात्र सद्यस्थितीत या योजनेचा पाण्याचा लाभ नागरिकांना होत नाही.ही योजना नाममात्र देवगड जामसंडे स्वतंत्र नळयोजना आहे मात्र उर्वरीत ९ गावांनाच पाणीपुरवठा होत आहे.या योजनेच्या पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांनी दहिबांव येथून पुरक नळयोजना निर्माण करून देवगड जामसंडेवासियांचा पाणीप्रश्न सोडविला.त्यावेळी तत्कालीन आमदारांनी नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीरतेने मार्गी लावला परंतू त्यानंतर गेली ३० वर्षे त्या नळयोजनेच्या सक्षमीकरणासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. दुरूस्ती व सक्षमीकरणासाठी ९ कोटी निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली मात्र पुढील प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष सक्षमीकरणाचे काम लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.कोर्लेे सातंडीवरून योजना ही काळाची गरज आहे मात्र सध्या ज्या नळयाजनेवरून पाणीपुरवठा होत आहे ती योजना सक्षम करा अशी मागणी केली.
त्याचबरोबर ज्या सात गावांना देवगड जामसंडेसाठी नवीन प्रस्तावित केलेल्या कोर्ले सातंडी धरणारवरील नळयोजनेच्या विहीरीवरून पाण्याचा वापर करण्यास परवानगी मागीतली आहे ती देण्याचा ठराव देण्यापुर्वी पाडाघर नळयोजनेवरून स्वतंत्र नळयोजना असूनही पाणी मिळत नाही याचा विचार करावा.मागील कटू अनुभव लक्षात घ्यावेत असे नितीन बांदेकर, बुवा तारी, तेजस मामघाडी यांनी निदर्शनास आणून दिले व अटीशर्थी टाकून अथवा मार्गदर्शन घेवून नंतरच ठराव घेण्यात यावा अशी सुचना केली.यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर ठरावास मान्यता देण्यात आली या ठरावामध्ये सात गावांनी उपांगाचा वापर न करणे, लाईटबील स्वतंत्र, पाईपलाईन स्वतंत्र, देखभाल दुरूस्तीचा खर्च संयुक्तिक, टड्ढान्सफार्मर मीटर स्वतंत्र, वितरणव्यवस्था स्वतंत्र, काही बदल करावयाचा असल्यास न.पं.ची पुर्वपरवानगी घेण्यात यावी आदी अटीशर्तीसह अधिन राहून ठरावाला मान्यता देण्यात आली.