बांदा
इन्सुली येथे शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा
. इन्सुली येथील शिवप्रेमीनी इन्सुलि डोबाशेळ येथून बाईक रॅली काढली. तर सर्व शिवप्रेमीनी गावठण येथे एकत्र येत शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शालेय विद्यार्थी यांचे सास्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात समूहगीत आणि शिवजन्म सोहळा सादर करण्यात आला.
यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर,शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, तारामती नाईक,व मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळकरी मुलांनी केलेले सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरले.
इन्सुली गावठणवाडी येथील शिवाजी चौक मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते.या निमित्ताने हजारो शिवप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. बुधवारी सकाळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर,शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, तारामती नाईक,व मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्ते सूर्या हळदणकर यांनी श्रीफळ वाढवुन कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे,माजी सरपंच नाना पेडणेकर, मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, स्वागत नाटेकर, सोनाली मेस्त्री, आरती परब, कृष्णा सावंत, न्हानु कानसे, चेअरमन दीपक इन्सुलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजेंद्र कोठवळे, पोलीस पाटील जागृती गावडे, नुतन माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, विद्या विकास मंडळचे संचालक अजय कोठावळे, रामा परब,रघुवीर देऊलकर, आजो परब, कृष्णा नाईक, उल्हास गावडे. आबा परब, अनिल आईर, राघोबा जाधव, दाजी जाधव, शंभा नाईक, बबन राऊळ, जनार्दन कुडव,, विशाल गावडे, संतोष मेस्त्री, अमोल शिरोडकर , विनय परिट, रुपेश परब, शुभम मुळीक,संजय पालव,अनिल गावडे, आपा आमडोसकर, विनय गावकर, समीर गावडे, महेश गावडे आदीसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार विनोद गावकर यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा शिवप्रेमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जय भवानी कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी उशिरा आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला.
