मुणगे लब्देवाडी येथे चालत्या व्हॅगनार कारने घेतला पेट
देवगड (प्रतिनिधी) २७ जुलै २०२४
मुणगे लब्देवाडी येथील महेंद्र यशवंत नाटेकर यांच्या चालत्या व्हॅगनार कारला (एम. एच. ०१, ईई ०३१७) शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास अचानक आग लागून कार आगीत पूर्णतः जळाली. ही घटना मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर घडली. या घटनेत नाटेकर हे सुदैवाने बचावले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
