ओव्हर फ्लो ! सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण 

0 minutes, 0 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) 

ओव्हर फ्लो ! सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण 

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली होती. आता धरण ओसंडून वाहत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे. यामुळे शहराच्या पाणीटंचाईची चिंता मिटणार आहे.

पाळणेकोंड धरणावर गुरुत्वाकर्षणावर चालणारी नळपाणी योजना असल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढून शेती आणि इतर गरजांसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. सावंतवाडीकरांसाठी दिलासा देणारे हे वृत्त आहे‌.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *