दादरा वार्षिक उत्सवामुळे कुणकेश्वर गाव वेशी प्रवेश राहणार उद्या दुपारी ३ ते रात्री ८ वा. या कालावधीत बंद

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

दादरा वार्षिक उत्सवामुळे कुणकेश्वर गाव वेशी प्रवेश राहणार उद्या दुपारी ३ ते रात्री ८ वा. या कालावधीत बंद

१ ते ३ फेब्रुवारी मंदिराच्या वार्षिक उत्सव निमित्त भाविकांसाठी मंदिरातील पूजा विधी राहणार बंद

श्री कुणकेश्वर देवस्थानचे दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दादरा वार्षिक सायंकाळी ३ वा. ते रात्रौ – ८ वाजेपर्यंत या कालावधीत करण्यात येणार आहे.या कालावधीत मंदिर व परिसर आणि दुकानें तसेच वर्दळ, येणे जाणे बंद राहणार आहे. तसेच या कालावधी मध्ये कुणकेश्वरमध्ये येणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात येतील. गावच्या वेशीत प्रवेश बंद राहणार आहे.

तसेच दि १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तिन्ही दिवशी देवस्थानची महत्वाची वार्षिके होणार आहेत त्यामुळे मंदिरामध्ये भाविकां साठीच्या पूजा विधी बंद राहतील. याची सर्व भाविक भक्त, पर्यटक आणि ग्रामस्थानी नोंद घ्यावी. असे अध्यक्ष श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *