कणकवली दि २५ जानेवारी ( प्रतिनिधी)
शिक्षण महर्षी सतिश सावंत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अव्वल शिक्षणाची सोय कनेडी हायस्कूल च्या माध्यमातुन उपलब्ध करुन दिली
शालेय समिती चेअरमन श्री. आर. एच. सावंत यांचे प्रतिपादन
संस्था अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव :- वाढदिवस कनेडी प्रशालेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महामेरु,सहकारमहर्षी,कृषिरत्न,शिक्षण महर्षी, शिक्षणाचे अग्रदूत असणारे सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अव्वल शिक्षणाची सोय कनेडी हायस्कूलच्या माध्यमातुन उपलब्ध करुन दिली आहे.माझी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये प्रशालेने नावलौकिक मिळवलेला आहे.याचे श्रेय संस्था अध्यक्ष सतिश सावंत यांचे आहे.असे प्रतिपादन शालेय समिती चेअरमन श्री. आर. एच. सावंत यांनी केले.
ते कनेडी प्रशालेत संस्थेचे अध्यक्ष सतिश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी बोलत होते.यावेळी केक कापून सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंडळाचे उपाध्यक्ष पी.डी.सावंत,सरचिटणीस श्री. शिवाजी सावंत, श्री .तुषार सावंत, श्री.सुधाकर सावंत, श्री. बावतीस घोन्सालवीस, श्री. चंद्रशेखर वाळके, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण आदी उपस्थित होते .

