देवगड – प्रतिनिधी
दुचाकी अपघातातील गंभीर असलेले तळेबाजार येथील पारकर यांचे उपचारादरम्यान मृत्यू
दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) यांचे गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला .पार्थिवावर शनिवारी सकाळी वरेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
