चिंदर सडेवाडी चोरीच्या घटनांबाबत पोलीसांचे आवाहन ; अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

0 minutes, 0 seconds Read

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

चिंदर सडेवाडी चोरीच्या घटनांबाबत पोलीसांचे आवाहन ; अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

आचरा परीसरात काही ठरा्वीक भागातील चोरीच्या घटना वगळता चिंदर सडेवाडी या भागातील घटनांमध्ये कोणताही चोरीचा उद्देश दिसून येत नाही त्यामुळे अशाप्रकारच्या घटनांमधून अफवा पसरवली जात आहे. तरी याबाबत कोणी असफवा पसरवून भीती निर्माण करु नये . लोकांनी देखील अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

तसे प्रयत्न कोणी करत असतील तर कडक कारवाईचा इशारा आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिला आहे.
चिंदर गोलतकर वाडी येथील महिला घरातील मागिल दरवाजा बंद करण्या साठी गेली असता ऐवजाची पिशवी पळविण्याचा झालेला प्रकार हा कुत्र्याने केल्याची माहिती पोलीस प्रशासनास प्राप्त झाली आहे. चिंदर मसुरकरवाडी येथेही पहाटेच्या घटनेबाबत ठोस माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे काही ठिकाणी चोरीचा उद्देश दिसून येत नाही.

उगाच अफवा पसरल्या जात आहेत.काही ठराविक ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांबाबत पोलीस प्रशासन योग्य प्रकारे तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *