वेंगुर्ला प्रतिनिधी
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन ११ व १२ जानेवारीला
वेंगुर्ला -रामघाट येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन 11 व 12 जानेवारी रोजी आयोजित केले आहे 11 रोजी संद्याकाळ 5:30 पासून या कार्यक्रमाला सुरवात होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख. संचालक प्रशांत नेरुरकर उपस्थित राहणार आहेत.
2 दिवस चालणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमात संगीत. नृत्य. खेळ. करमणूक. तसेंच खवय्यांसाठी मेजवानीच असणार आहे. तसेच सर्वांसाठी लकी ड्रॉ पण होणार असून भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन दिवस चालणारे कार्यक्रम म्हणजे वेंगुर्ल्याचा मिनी पर्यटन महोत्सव कम फूड फेस्टिवल असतो. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांनी केले आहे
