अरे बाबा ; आरोंदा येथे पट्टेरी वाघाचे live दर्शन.

0 minutes, 1 second Read

 

 

अरे बाबा ; आरोंदा येथे पट्टेरी वाघाचे live दर्शन.

सावंतवाडी (प्रतिनीधी)

गोवा येथे जात असलेल्या चारचाकी गाडीसमोर आरोंदा येथे रस्त्यावर” उमळात” याठिकाणी अचानक आज रात्री 08:00 च्या सुमारास वाघाचे दर्शन घडले. गाडीची लाईट त्या पट्टेरी वाघावर पडली तरीही हा वाघ एकदम आपल्या दिमाखात रस्ता अडवून बसलेला होता. काही वेळाने त्या वाघाने आपल्या नैसर्गिक अधिवासात पलायन केले.

 

गोवा केरी येथे जाणाऱ्या चारचाकी गाडीतील प्रवाशांच्या निदर्शनास आलेला हा वाघ तब्बल दहा मिनिटे रस्ता रोखून बसला होता. वाघाने आपल्या अधिवासात पलायन केल्यानंतर गाडीतील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. हे जंगलातील प्राणी बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.याची वनविभागाने त्वरित नोंद घेणे गरजेचे आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *