तन्वी कदम यांचे सीए परीक्षेत यश

 

कणकवली ( प्रतिनिधी)

तन्वी कदम यांचे सीए परीक्षेत यश

कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या कु. तन्वी कदम यांनी चार्टर्ड अकाऊंटंट (सी. ए.) परीक्षेत यश मिळविले आहे. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो. एकाचवेळी दोन ग्रुप घेऊन कु. कदम यांनी ही परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे कसाल गावात तन्वी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तन्वी यांचे शिक्षण ओरोस डॉन बॉस्को हायस्कूल येथे झाले. दहावीच्या परीक्षेत त्यांनी १०० टक्के गुण मिळविले होते. त्यानंतर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. तसेच ती बी. कॉम. परीक्षेतही टॉपर होत्या. शैक्षणिक वाटचालीबरोबरच त्यांनी खेळ, सांस्कृतिक विभाग आणि अभ्यास या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले.

आपल्या यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, क्षेत्र कोणतेही असो. जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य आणि एकाग्रता यावर यश अधोरेखित करता येते. दिलेला आणि ‘आई-वडिलांनी आत्मविश्वास गुरुवर्यांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळू शकले. कु. तन्वी म्हणाल्या, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आई- वडिलांनी केलेला त्यांच्या जीवनातील प्रवास आणि माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा, याची छोटीशी भेट मी त्यांना दिली आहे.’ खासदार नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *