गोवळ येथे श्री पावणादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न

 

देवगड (प्रतिनीधी)

गोवळ येथे श्री पावणादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट

देवगड  गोवळ येथे श्री पावनादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि 28 डिसेंबर व रविवार दि 29 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मंदिराच्या द्विवार्षिक आठवा वर्धापन दिनास उपस्थित राहून शुभेच्या दिल्या. मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत दिनेश नारकर, मंडळाचे अध्यक्ष विष्णू घाडी, उपाध्यक्ष दुर्गाराम जोशी व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *