बांदा व्यायामशाळेला चार्जिंग बल्ब भेट ,बाबा काणेकर आणि आबा धारगळकर यांचा स्तुत्य उपक्रम
बांदा येथील श्री बांदेश्वर व्यायाममंदिर या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या व्यायाम शाळेला बांदा शहर भाजप अध्यक्ष बाबा काणेकर आणि बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांच्या वतीने चार्जिंग बल्ब आणि लाईट फिटिंग व्यवस्थेची सोय करण्यात आली. श्री बांदेश्वर व्यायाम मंदिर ही बांद्यातील जुनी व्यायाम शाळा असून या जिम मध्ये मोठ्या संख्येने युवक व्यायाम करण्यासाठी येतात.१९८३ सालापासून संस्थापक सतिश येडवे आणि सहकारी मित्रमंडळींमार्फत निरपेक्ष भावनेतून सामाजिक उपक्रम म्हणून सेवाभावाने या व्यायाम शाळेचे व्यवस्थापन केले जाते.सध्या लाईट गेल्यावर व्यायाम शाळेत व्यायाम करताना व्यायामपटूंना मोठी समस्या होत होती.
मेणबत्ती किंवा मोबाईलच्या प्रकाशात व्यायाम करावा लागत असे. ही समस्या हेरून भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर आणि बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांनी चार्जिंग चे एलईडी बल्ब व्यायाम शाळेला प्रदान केले व त्यासाठी लागणाऱ्या लाईट फिटिंगचा खर्चही त्यांच्या वतीने करण्यात येणार असे सांगितले .बांदा व्यायाम शाळेचे व्यवस्थापन प्रमुख साईराज सतीश येडवे यांच्याकडे हे बल्ब प्रदान करण्यात आले . यावेळी शैलेश केसरकर, संदेश सातार्डेकर ,अजित मयेकर, आशुतोष भांगले तसेच अनेक व्यायामपटू उपस्थित होते.
यामुळे व्यायाम पटूंची चांगली सोय होणार असून अचानक लाईट गेल्यानंतर जी समस्या होत होती त्याचे निराकरण होणार आहे त्याबद्दल श्री बांदेश्वर व्यायाम मंदिराच्या सदस्यांनी बाबा काणेकर आणि आबा धारगळकर यांचे आभार व्यक्त केले आहे