ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिना निमित्त कॅप्टन श्यामकांत गावडे व माजी सैनिक अमर विद्याधर रेवनकर यांचा सन्मान

 

 

कणकवली दि‌ ११ डिसेंबर (प्रतिनिधी)

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिना निमित्त कॅप्टन श्यामकांत गावडे व माजी सैनिक अमर विद्याधर रेवनकर यांचा सन्मान

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिना निमित्त साळेल गावचे सुपुत्र कॅप्टन श्यामकांत गावडे तसेच मालवण गुरामवाडी-कट्टा गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक अमर विद्याधर रेवनकर या दोघांचा त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल यथोचित गौरव करण्यात आला.

 

 

 

साळेल गावचे सुपुत्र कॅप्टन श्यामकांत गावडे यांचा त्यांच्या उत्तम कार्याच्या गौरवास्पद कामगिरी बद्दल संघटने तर्फे सन्मान करण्यात आला. ते ७ जुलै १९८४ रोजी नौदलात भरती झाले.

त्यांचे बेसिक नेव्हल ट्रेनिंग – मांडवी (गोवा) येथे झाले आणि प्रोफेशनल ट्रेनिंग (नेवीगेशन ब्रॅन्च) – कोचीन येथे झाले. पंधरा वर्षाच्या देशभरातील विविध ठिकाणच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले परंतु आजही ते कॅप्टन म्हणून मर्चंट शिपवरती कार्यरत आहेत आणि अत्यावश्यक ऑपरेशनस करत आहेत. त्यांच्या या देश सेवेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 

 

तसेच मालवण गुरामवाडी-कट्टा गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक अमर विद्याधर रेवनकर यांचा देखील संघटनेच्या वतीने आदर सत्कार करण्यात आला. ते भारतीय सैन्य दलात १७ जानेवारी २००२ मध्ये मराठा लाईट इन्फंट्री मध्ये भरती झाले. ९ महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांना १२ मराठा बटालियन मध्ये निवडण्यात आले.

या दरम्यान त्यांनी विविध प्रकारच्या ठिकाणी देश सेवा केली.२००३-२००४ सियाचीन ग्लेशियर, २००५-२००८ जामनगर, गुजरात, २००९-२०११ इंफाळ, मणिपूर, २०१२-२०१४ कानपूर, २०१५-२०१७ जम्मू आणि काश्मीर,
२०१८-२०२० पठाणकोट, पंजाब,२०२१-२०२२ नथुला बॉर्डर, सिक्किम आणि शेवटची नियुक्ती २०२३ मध्य प्रदेश येथून ते सेवा निवृत्त झाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना देखील शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 

 

याप्रसंगी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव अर्जुन परब, मालवण तालुका कार्याध्यक्ष श्री.प्रभुखानोलकर, संघटक व निरीक्षक संदेश फाटक, तालुका सचिव राजेश लब्दे, संघटक आणि जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर आदी उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *