
मुंबई : टी२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने मोठी भूमिका बजावली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्यानं कमाल केली होती. अंतिम आणि निर्णायक षटक हार्दिक पांड्याने टाकलं होतं. त्यात आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती. आता हार्दिक पांड्याने टी२० वर्ल्ड कप विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्याच्या कमबॅकवर बोलला आहे.
