शिरोडा वेळागर येथे स्थानिकांना त्याच्या ताब्यातील जमिनी सोडा,अन्यथा संघर्ष अटळ -राजन तेली

0 minutes, 0 seconds Read

शिरोडा वेळागर येथे स्थानिकांना त्याच्या ताब्यातील जमिनी सोडा,अन्यथा संघर्ष अटळ -राजन तेली

वेंगुर्ला –

शिरोडा वेळाघर येथे
ताज प्रोजेक्टचा पर्यटनावर आधारित प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला असूनया ठिकाणच्या स्थानिकांच्या ताब्यातील नऊ हेक्टर जमीन सोडून इतरजागेवर सदरचा प्रकल्प करावा अशी मागणी गेले कित्येक दिवस या ठिकाणचे ग्रामस्थ संबंधितकंपनीकडे करत आहेतमात्र अद्यापहीनऊ हेक्टर जागेबद्दल आठवण असा निर्णय झाल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.

वेळागर येथे असणाऱ्या ९ हेक्टर क्षेत्रातील जमीनी, जिथे लोकांची राहती घरं आहेत, वस्ती आहेत ह्या जमिनी शासनाने १९९५ साली एमटीडीसीच्या मार्फत पर्यटनाच्या नावाखाली कवडीमोल भाव देऊन गावकऱ्यांकडून विकत घेतल्या आणि ताज प्रोजेक्टला हस्तांतरित केल्या होत्या.काळ बदलत गेला तश्या इथल्या जमिनीची मागणी वाढत गेली. गावात प्रगती होतेय त्याबद्दल काही दुमत नाही परंतु जेव्हा गावठाण म्हणून घोषित असलेल्या जमिनी घेण्याचा पुन्हा प्रयत्न झाला तेव्हा त्याला तीव्र विरोध स्थानिकांकडून करण्यात आला. याबाबत स्थानिक भूमिपुत्रांनी माजी आमदार राजन तेली यांच्याकडे सदरची हकीगत कथित केली. राजन तेली यांनी वेळागर येथे जात ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी नो ऍक्टर जागा का सोडावी यासंदर्भातीलकारणे ग्रामस्थांनी तेली यांना सांगतआज पर्यंत कंपनीच्या एकाही व्यक्तीशी थेट संवाद ग्रामस्थांची झाला नसून दीपक केसरकर हेच या ठिकाणी मध्यस्थी करत आहेतयामुळे आपण ताज हॉटेलच्या मॅनेजमेंटची भेट घडवताना आम्ही त्यांच्यासमोर आमची व्यथा मांडूअशी विनंती ग्रामस्थांनी तेली यांना केली यावेळी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ताज हॉटेलच्या मॅनेजमेंटची भेट घालून देण्यासंदर्भात आपणप्रयत्न करतो असे आश्वासन दिले.तसेच नऊ हेक्टर जागा कंपनीकडून सोडण्यासंदर्भात आपण योग्य तो प्रयत्न करेन असे आश्वासनही दिले.
या बैठक प्रसंगी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य श्री. मयूरेश शिरोडकर,माजी शिरोडा सरपंच श्री. मनोज उगवेकर,आरवली सरपंच श्री. समीर कांबळी,भाजप वेंगुर्ला मंडळ उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत कर्पे,रेडी जि.प. विभाग प्रमुख श्री. अमित गावडे,शिरोडा भाजप उपाध्यक्ष श्री. संतोष अणसूरकर,शिरोडा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री. सोमाकांत सावंत,भाजप शिरोडा ज्येष्ठ पदाधिकारी श्री. चंद्रशेखर गोडकर, श्री. अनिल गावडे, श्री. मनोहर होडावडेकर, श्री. दत्ताराम फटजी, शिरोडा भाजप पदाधिकारी श्री. योगेश वैदय, दादा शेटये,
शिरोडा,रेडी,आरवली शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे –
श्री. विद्याधर धानजी, श्री. जगन्नाथ राणे, श्री. महादेव नाईक,भाजप रेडी अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर केरकर,उपाध्यक्ष श्री. ओकांर कोनाडकर,भाजप रेडी पदाधिकारी श्री. उत्तम कांबळी,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी श्री. देवेंद्र उर्फ बाळू वस्त व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *