देवगड (प्रतिनीधी)
मिठबाव श्री देव विठ्ठल रखुमाई समता मंदिर मूर्ती पुन:प्रतिष्ठापना निमित्त ४ ते १३ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्री देव रामेश्वर प्रसादिक मंडळ मिठबाव व मुंबई यांच्या वतीने मिळवा श्री देव विठ्ठल रखुमाई समता मंदिर मूर्ती पुन:प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम संपन्न होणार असून यानिमित्त ४ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने होणारे कार्यक्रम दिनांक ४ डिसेंबर – सायंकाळी ४ वाजता ग्रामदेवतांना निमंत्रण सायंकाळी ५ वाजता श्रींच्या मुर्त्यांची श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव येथून भव्य मिरवणूक, गुरुवार ५ डिसेंबर – सकाळी ८ ते १२:३० शांतीपाठ, मंगलाचरण, संकल्प, पुण्याह वाचन, आचार्यवरण, देवता स्थापन, जलादिवास, अग्नि स्थापन, बाह्यग्रह प्रित्यर्थ हवन. , शुक्रवार ६ डिसेंबर – सकाळी ८ ते १२:३० स्थापित देवता पूजन ,मुख्यदेवता प्रित्यर्थ हवन,प्रतिष्ठापना, कलशारोहण, बलिदान , पूर्णाहूती अभिषेक, सांगता आरती, मंत्रपुष्प, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ सुश्राव्य भजन, रात्री ९:३० ते १२:३० गजर कीर्तनाचा आनंद सोहळ्याचा निरूपण ह. भ. प. बुवा श्री कैलासराव खरे मुंबई यांच्या कार्यक्रम, शनिवार ७ डिसेंबर – रात्री ९:३० वा. फुगडी नृत्य (श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ), रविवार ८ डिसेंबर – दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी ७ वाजता महाआरती रात्री १० वाजता ट्वेंटी-ट्वेंटी सामना बुवा श्री संदीप लोके लिंगडाळ बुवा श्री संदीप पुजारे नाडन.
सोमवार ९ डिसेंबर- रात्री ९:३० वाजता समई नृत्य (श्री ब्राह्मण देव महिला मंडळ नाद भोळेवाडी) बुधवार दिनांक ११ डिसेंबर- मोक्षदा एकादशी मार्गशीष शुद्ध एकादशी सात प्रहराचा अखंड हरिनाम सोहळा प्रारंभ गुरुवार १२ डिसेंबर- दुपारी १२ वाजता हरिनाम सोहळ्याची सांगता शुक्रवार १३ डिसेंबर- दुपारी १ ते ३ महाप्रसाद रात्री ९:३० लळीताचा कार्यक्रम सुश्राव्य गायन(सादरकर्ते युसुफ आवटी शिरोडा ) आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
