शालेय विद्यार्थी प्रवासी फेरी व अन्य समस्यांबाबत देवगड मधील प्रवासी बंधूंच्या वतीने शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक विजय घोलप यांची भेट

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

शालेय विद्यार्थी प्रवासी फेरी व अन्य समस्यांबाबत देवगड मधील प्रवासी बंधूंच्या वतीने शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक विजय घोलप यांची भेट

देवगड आगारातील शालेय विद्यार्थी प्रवासी फेरी व अन्य समस्यांबाबत देवगड मधील प्रवासी बंधूंच्या वतीने शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक विजय घोलप यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे भाजपा देवगड शक्ती केंद्रप्रमुख उल्हास मणचेकर ,प्रवासी प्रतिनिधी सुरेश कमळे, आनंद उर्फ बाबू वाडेकर, निलेश सावंत, चेतन चांदोस्कर, प्रवासी मित्र दयानंद मांगले, सुरज कोयंडे उपस्थित होते.

शिष्टमंडळाच्या वतीने प्रामुख्याने देवगड आगाराची सकाळी ७.१५ वाजता सुटणारी देवगड कणकवली व्हाया देवगड बंदर ही शालेय प्रवासी फेरी अचानक बंद करून तसेच प्रसंगी विलंबाने येत असल्यामुळे विद्यार्थी वर्गांची गैरसोय होते. त्याचबरोबर देवगड कुंभवडे ही व्हाया देवगड बंद प्रवासी फेरी व्हाया रेल्वे स्टेशन नांदगाव जात असल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमानी प्रवासी वर्गाची ही प्रवासी रद्द केल्याने गैरसोय होते त्याचबरोबर परतीच्या प्रवासाकरता ही फेरी देवगड देवगड बंदर या मार्गावर येत असताना विद्यार्थ्यांना घरी जाण्याकरिता प्रवासी फेरी उपलब्ध नसल्यामुळे त्यांची हाल होतात या प्रमुख मागण्यांकडे या शिष्टमंडळाने आवर्जून लक्ष वेधले व सदर दोन्ही फेऱ्या ह्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात याव्या व वेळेत सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली.

याबरोबरच गेली कित्येक दिवस महिने देवगड आगाराच्या दुरुस्तीचे काम सुरू असून यात बस स्थानकावरील प्रसाधन गृहाचे काम हे अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाबरोबर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबर गावाहून येणाऱ्या शैक्षणिक सहली या सर्वांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधले असता सदर प्रसाधन गृहाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे व प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. त्याचबरोबर देवगड आगारातून सुटणारी देवगड बोरिवली मार्गावरील प्रवासी फेरी ही एक दिवस आड शयनासनी सोडली जाते त्यामुळे प्रवासी व कर्मचारी चालक वाहक यांच्यात वाद निर्माण होतात तरी सदर मार्गावर दोन्ही फेऱ्या या शयानासनी सोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात येऊन देवगड आगार करीता दहा प्रवासी फेऱ्यांची मागणी करण्यात यावी अशी सूचनाही यावी करण्यात आली.

यावेळी यापुढील काळात दोन्ही मार्गावर देवगड बोरिवली ही नियमित प्रवासी फेरी सोडण्यात येईल असे आगार व्यवस्थापक विजय घोलप यांनी सुचित करून दुसऱ्या प्रवासी फेरीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने सोमवारपासून या दोन्ही प्रवासी केल्या बोरवली मार्गावर सुरू करण्यात येतील असे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने ४० नव्या एसटी गाड्या दाखल होणे दाखल होणार असल्याचे समजते त्यानुसार देवगड आगाराकडे मुळातच दहा ते बारा गाड्यांची कमतरता असताना अन्य गाड्या ही जुन्या जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे देवगड आगाराला नव्याने दहा ते बारा एसटी गाड्या परिवर्तन बस देण्यात याव्यात अशी मागणी या शिष्टमंडळाने यावेळी बोलताना केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *