आमदार नितेश राणेंची हॅट्रिक , हिंदु एकत्र झाला ; कार्यकर्त्यांची अपार मेहनत , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे सहकार्य – अँड अजित गोगटे

 

देवगड : प्रतिनिधी

आमदार नितेश राणेंची हॅट्रिक , हिंदु एकत्र झाला ; कार्यकर्त्यांची अपार मेहनत , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे सहकार्य – अँड अजित गोगटे

कार्यकर्त्यांचे सांघिक काम, लाडकी बहिण यासारखी कल्याणकारी योजना व आमदार नितेश राणे यांचा बुथपर्यंत प्रत्येक मतदाराशी असलेला संपर्क व झालेली विकासकामे यामुळे आमदार नितेश राणे हे भरघोस मतांनी निवडुन आले.विधानसभा मतदारसंघात देवगड तालुक्यातून प्रथम क्रमांकाची मते मिळाली असून मुस्लिम वस्ती असलेले तीन बुथ वगळता संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक बुथवर आमदार नितेश राणे यांना आघाडी मिळाली यामुळे त्यांनी विजयाची हॅट्रिक केली अशी प्रतिक्रिया माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे यांनी दिली.

 

 

जामसंडे येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, बाळा खडपे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, संतोष किंजवडेकर, डॉ.अमोल तेली, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर, तालुकाध्यक्षा सौ.उष:कला केळूसकर, शहर अध्यक्ष योगेश पाटकर, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, भाजपा न.पं.गटनेते शरद ठुकरूल, कौस्तुभ जामसंडेकर, बापु जुवाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

माजी आमदार गोगटे यांनी निकालाचे विश्लेषण करताना पत्रकार परिषदेत केले.आमदार नितेश राणे यांचा मतदारांशी असलेला संपर्क ही विजयातील जमेची बाजु ठरली.तसेच गावागावात झालेली विकासकामे ही निर्णायक ठरली.या निवडणुकीमध्ये आमदार नितेश राणे यांनी विकासाचा मुद्दा वापरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोलाचे सहकार्य केले.कार्यकर्त्यानी अपार मेहनत घेतली व या सर्वच गोष्टींवर मतदारांनी विश्वास ठेवला.

 

राज्यात महायुतीच्या कार्यकर्त्यानी एकत्रित काम करून एकीचा प्रत्यय दिला.यामुळे विजय सोपा झाला. महायुतीमध्ये मनसे समाविष्ट झाली असती तर किमान पाच आमदार तरी मनसेचे विधानसभेत गेले असते.सोमवारी शपथविधी होत आहे या नव्या मंत्रीमंडळात आमदार नितेश राणे हे मंत्री म्हणून शपथ घेतील अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

 

 

बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांच्यासारखे दिग्गज नेते हरले याला कारणच हिंदु एकत्र झाले.याचा परिणाम आपल्या मतदारसंघातही जाणवला असून हिंदुनी जोरदार समर्थन केल्यांनी मतांची टक्केवारी व आघाडीही सर्वच बुथवर कायम राहीली असेही गोगटे यावेळी म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *