देवगड (प्रतिनिधि)
देवगड जामसंडे शहरातून आमदार नितेश राणे यांना ३८०० मतांचे लीड असल्याने पाणी प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर…
आमदार नितेश राणे यांना देवगड जामसंडे शहरातुन मतदारांनी ३८०० मतांचे लीड दिले यामुळे या शहरांमधील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर असून शहरातील विशेषत: महत्वाचे असणारे पाणी व कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपा शहरअध्यक्ष योगेश पाटकर व भाजपा न.पं.गटनेते शरद ठुकरूल यांनी दिली. शहरात काही व्यक्ति हिरवेकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा पदाधिकारी हा प्रयत्न ठेचून काढतील असा इशारा माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी दिला.
जामसंडे येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत भाजपा शहर अध्यक्ष योगेश पाटकर, भाजपा न.पं.गटनेते शरद ठुकरूल, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर आदी उपस्थित होते.विकास या महत्वाचा मुद्द्यावरच आ.नितेश राणे यांनी विधानसभेच्या निवडणुकीची लढाई मोठ्या मताधिक्क्यांने जिंकली.त्यांनी केलेली विकासकामे, लाडक्या बहिणींचे आशिर्वाद, तसेच देवगड जामसंडेमधील हिंदु जागृत झाला यामुळे निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाले.देवगड जामसंडेमधील मतांचा हा उंचावत असलेला आलेख आम्ही कायम पुढे नेण्याचा प्रयत्न करू व शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे शरद ठुकरूल व योगेश पाटकर यांनी यावेळी सांगीतले.
