सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम (Implementation) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

 

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम (Implementation) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

Banking Systems Intelligence या जागतिक पातळीवरच्या बँकिंग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा Global Fintech Perspective अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम (Implementation) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार इन्फोसिस चे संचालक श्री. बॉबी पारेख यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांना ताज हॉटेल, मुंबई येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक श्री. नितीन सावंत, व्यवस्थापक श्री. रघुनाथ परब हे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *