डिगस गावात शेतीच्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी ; शेतकऱ्यांनी पंचनामे करून घ्यावेत – अमरसेन सावंत
कणकवली ( प्रतिनिधी) १० जुलै २०२४
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून डिगस गावात शेतीचे नुकसान झाले आहे.काल आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,अमरसेन सावंत, बबन बोबाटे, अतुल बंगे,सचिन काळप, गुरु गडकर अमित राणे आदी उपस्थित होते.
यावेळी आ.वैभव नाईक यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करत पंचनामा आणि नुकसान भरपाई बाबत चर्चा केली. कृषी अधिकाऱ्यांनी ते मान्य केले आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क करून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करून घ्यावेत असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केले आहे.