सावंतवाडी (मंगल कामत)
केसरकर यांची आमच्या संकल्पना प्रत्यक्षात उभारण्यासाठी भरघोस मदत – प्रतीक कांबळे
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना आंबेडकरी चळवळीतील तरूण कार्यकर्त्यांच्या असंख्य मागण्या पूर्ण केल्या. भरघोस निधी स्मारकांसाठी दिला. आमच्या संकल्पना प्रत्यक्षात उभारण्यासाठी भरघोस मदत केली. मंत्रीमंडळात आम्हाला आश्वासक चेहरा मिळाला. आंबेडकरी चळवळीतील प्रश्न त्यांनी मार्गी लावले. इथल्या आंबेडकरी जनतेत त्यांची ही प्रतिमा पोहचवत आहोत. गेले आठ दिवस या मतदारसंघात तळ ठोकून आहोत. त्यांचा विरोधक दिसून आला नाही. तेवढ्या ताकतीचा विरोधक नाही. त्यांच्यासाठी ही सोपी निवडणूक असून त्यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन विश्वशांती सामाजिक संस्था अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळ मुंबईचे युवा नेते प्रतीक कांबळे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कांबळे बोलत होते.
