मुंबई विद्यापीठातर्फे कोकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान देवगड महाविद्यालयाला

 

देवगड (प्रतिनिधी)

मुंबई विद्यापीठातर्फे कोकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान देवगड महाविद्यालयाला

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ०७ महाविद्यालयांचा सहभाग

देवगड येथील श्री. स. ह.केळकर महाविद्यालयामध्ये दि. १४ व १५ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कोंकण विभाग नं. ४ च्या आंतरमहाविद्यालयीन फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी क्रिडा युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या क्रिडा युवा महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी बुद्धीबळ, क्रिकेट, कब्बडी, व्हालीबॉल, फूटबॉल, बास्केटबॉल अश्या विविध क्रिडा प्रकरांच्या स्पर्धा घेण्यात येतात.

 

यावर्षी मुंबई विद्यापीठातर्फे कोंकण विभाग नं. ४ च्या आंतरमहाविद्यालयीन फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा बहुमान देवगड महविद्यालयाला मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून शिक्षण विकास मंडळाच्या नियामक समितीचे सदस्य मा. श्री. शैलेश महाडिक यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनूरे, उपप्राचार्य (प्रशासन) प्रा. श्रीकांत सिरसाठे, क्रिडा प्रमुख प्रा. प्रशांत राउत, कोंकण विभाग क्रिडा समितीचे सचिव प्रा. शशांक उपशेट्ये, आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेच्या निवड समिती सदस्य प्रा. चंद्रकांत नाईक उपस्थित मान्यवर होते. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ०७ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदविला होता.

 

या स्पर्धेमध्ये पुरुष गटात विजेता संघ :- जे. एस.एम.महाविद्यालय अलिबाग उपविजेता संघ:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि तृतीय क्रमांक: एस. पी. के.महाविद्यालय सावंतवाडी यांनी पटकविला. विजेत्या संघास गोल्ड मेडल व ट्रॉफी, उपविजेत्या संघास सिल्व्हर मेडल व ट्रॉफी आणि तृतीय संघास ब्रांझ मेडल व ट्रॉफी देऊन श्री. स. ह. केळकर कॉलेज चे प्रभारी प्राचार्य डॉ. कुनूरे आणि उपप्राचार्य (प्रशासन) प्रा.श्रीकांत सिरसाठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. देवगड महाविद्यालयाने स्पर्धेसाठी आलेल्या पंचांचे व विद्यार्थ्यांचे रहण्यापासून जेवणापर्यंत उत्तम प्रकारे व्यवस्थापन केल्याने उपस्थितांनी महाविद्यालयाचे आभार मानले व कौतुक केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री. मुकुल सोमण, श्री. वसंत कदम आणि निखिल भरतू यांनी मोलाची भूमिका निभावली.

 

सर्व यशस्वी संघांचे अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी केले आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पुढील फेरीसाठी कोंकण विभाग क्रमांक ४ चे फूटबॉल या खेळासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची नावे निवड समितीतर्फे जाहीर करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *