सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात सावंतवाडी प्रभाग सर्वसाधारण विजेता तर माडखोल प्रभाग उपविजेता
सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात सावंतवाडी प्रभाग सर्वसाधारण विजेता ठरला तर माडखोल प्रभाग उपविजेता ठरला. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी सागर साळुंखे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडीत जिमखाना मैदान येथे दोन दिवस चाललेल्या या क्रिडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या महोत्सवातील पारितोषिक वितरण गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्याहस्ते सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल लहान गट १) ५० मी. धावणे मुलगे – प्रथम गौरांग गजानन राऊळ ( वेर्ले शाळा नं .२ ), व्दितीय सुनिल संदेश परब ( पारपोली शाळा ), तृतीय कु ओम विठ्ठल सावंत ( डेगवे शाळा नं १), २) ५० मी. धावणे मुली – प्रथम आर्या सुनिल गावडे ( पाडलोस शाळा नं १ ), व्दितीय शुभ्रा परशुराम गवंडे ( मळगाव सावळवाडा शाळा ), तृतीय संघवी सगुण जाधव ( मळेवाड शाळा नं २), ३ )१०० मी. धावणे मुलगे – प्रथम ओम विठ्ठल सावंत ( डेगवे शाळा नं १ ), व्दितीय हर्ष सतिश राऊत ( कोलगाव नं.२ ), तृतीय सुनिल संदेश परब ( पारपोली शाळा ), ४ ) १०० मी. धावणे मुली – प्रथम नाव्या गुरुनाथ जंगले ( केसरी शाळा ), व्दितीय स्वरा संतोष माणगावकर ( सावंतवाडी कळसुलकर शाळा ), तृतीय जिविका श्रीकृष्ण मेस्त्री ( चराठे शाळा नं १ ), ५ ) लांबउडी मुलगे – प्रथम तन्मय अमित नाईक ( कोलगाव शाळा नं. २ ), व्दितीय शिवम दत्ताराम परब ( भालावल शाळा ), तृतीय फैसल शमीम अंसारी ( सावंतवाडी उर्दू शाळा ), ६ ) लांबउडी मुली – प्रथम शुभा परशुराम गवंडे ( मळगाव सावळवाडा शाळा ), व्दितीय रुंजी देवदास राऊळ ( नेमळे शाळा नं. १ ), तृतीय गुंजन सतिश सावंत ( असनिये शाळा ), ७ ) उंचउडी मुलगे – प्रथम चंद्रकांत बापू गांवकर ( ओटवणे शाळा नं ४ ), व्दितीय बाबाजी विजय कविटकर ( घारपी शाळा ), तृतीय कौस्तुभ गजानन वरक (देवसू), ८ ) उंचउडी मुली – प्रथम प्रांजल बाळकृष्ण मुरकर ( माडखोल धवडकी शाळा ), व्दितीय अनुष्का देवदास गवंडे ( मळगाव सावळवाडा शाळा ), तृतीय अनुश्री उल्हास जाधव ( कोलगाव शाळा नं.१), ९ ) ५० X ४ रिले मुलगे – प्रथम माडखोल शाळा नं. १, व्दितीय मळेवाड शाळा नं. २, १० ) ५० x ४- रिले मुली – प्रथम नेमळे शाळा नं. १, व्दितीय केसरी शाळा, ११ ) कबड्डी मुलगे – प्रथम आंबोली नांगरतास शाळा, व्दितीय न्हावेली शाळा नं १, १२ ) कबड्डी मुली – प्रथम कोलगाव शाळा नं. १ आणि कोलगाव शाळा नं. २, व्दितीय केसरी शाळा, १३ ) खोखो मुलगे- प्रथम बांदा शाळा नं. १, व्दितीय सोनुर्ली नं. १, १४ ) खोखो मुली – प्रथम निरवडे शाळा नं. १ आणि मळगाव रस्ता शाळा, व्दितीय सावंतवाडी कळसुळकर शाळा, १५ ) ज्ञानी मी होणार – प्रथम यश संजय परब आणि गौरांगी समीर रानगावकर ( तळवडे शाळा नं. १ ), व्दितीय विहान अरुण गवस आणि विहान विनायक शेर्लेकर ( बांदा शाळा नं १ ), १६ ) समूहगान – प्रथम सावंतवाडी शाळा नं. ४, व्दितीय कास शाळा नं. १, १७ ) समूहनृत्य – प्रथम आरोंदा शाळा, व्दितीय माजगाव शाळा नं. ३ तसेच मोठा गट – १) १०० मी. धावणे मुलगे – प्रथम आयुष मदन जाधव ( कारिवडे शाळा नं. १ ), व्दितीय तेज परशुराम पाटील ( सावंतवाडी शाळा नं. ४ ), तृतीय उदय संजय गावडे ( तळवणे शाळा नं १ ), २) १०० मी. धावणे मुली – प्रथम निवेदिता सागर मुननकर ( नेमळे शाळा नं. ३ ), व्दितीय अन्विता दीपक तेली ( माडखोल शाळा नं. १ ), तृतीय गौरी राजन गावडे ( कास शाळा नं. १ ), ३ ) २०० मी. धावणे मुलगे- प्रथम हर्ष रवींद्रनाथ गोसावी ( सावंतवाडी शाळा नं. ४ ), व्दितीय जगू देवू यमकर ( आंबोली नांगरतास शाळा ), तृतीय जयराम संदीप गावकर ( ओटवणे शाळा नं १ ), ४ ) २०० मी. धावणे मुली – प्रथम वैष्णवी बाळकृष्ण म्हालटकर ( माडखोल नं. १ ), व्दितीय निवेदिता सागर मुननकर ( नेमळे शाळा नं. ३ ), तृतीय आजमीन नजीर शेख ( इन्सुली शाळा नं. ४ ), ५) लांबउडी
मुलगे -प्रथम भावार्थ नवलु झोरे ( आंबेगाव शाळा नं. १ ), व्दितीय आयुष अनिल सावंत ( इन्सुली शाळा नं. ५ ), तृतीय सूरज हनुमंत नेमळेकर ( नेमळे शाळा नं. १ ), ६ ) लांबउडी मुली – प्रथम अन्विता दीपक तेली, व्दितीय वैष्णवी बाळकृष्ण म्हालटकर ( दोन्ही माडखोल नं. १ ), तृतीय दिया वासुदेव सावंत ( आजगाव शाळा नं १ ), ७ ) उंचउडी मुलगे – प्रथम तनय शिवा गावकर ( घारपी शाळा ), व्दितीय यश विठ्ठल झोरे, तृतीय कु. भावार्थ नवलु झोरे ( दोन्ही आंबेगाव शाळा नं. १ ), ८ ) उंचउडी मुली – प्रथम सोनम मंगेश गावडे ( सरमळे देऊळवाडी शाळा ), व्दितीय चैताली दत्ताराम सातार्डेकर ( सातार्डा शाळा नं. १ ), तृतीय प्रज्ञा विजय भगत
( मळगाव सावळवाडा शाळा ), ९ ) गोळाफेक मुलगे – प्रथम तनय शिवा गावकर ( घारपी शाळा ), व्दितीय खेमराज अलबा घाडी ( कारीवडे पेडवे शाळा ), तृतीय सोहम प्रशांत पानोळकर ( माडखोल धवडकी शाळा ), १०) गोळाफेक मुली – प्रथम सोनम राजू लमाणी ( बांदा शाळा नं.१ ), व्दितीय ख़ुशी राजन घावरे ( शिरशिंगे गोठवे शाळा ), तृतीय श्रावणी सत्यवान नाईक ( मळेवाड शाळा नं. २ ), ११) १००x ४ रिले मुलगे – प्रथम सावंतवाडी शाळा नं. ४, व्दितीय इन्सुली शाळा नं. ४, १२ ) १०० x४ रिले मुली – प्रथम माडखोल शाळा नं. १, व्दितीय नेमळे शाळा नं. ३, १३ ) कबड्डी मुलगे – प्रथम मळेवाड शाळा नं. २, व्दितीय केसरी शाळा, १४) कबड्डी मुली – प्रथम सरमळे देऊळ शाळा, व्दितीय मळेवाड शाळा नं. २, १५ ) खोखो मुलगे – प्रथम ओटवणे शाळा नं. १, व्दितीय बांदा शाळा नं. १, १६ ) खोखो मुली- प्रथम विलवडे शाळा नं. १, व्दितीय माडखोल शाळा नं.१, १७ ) ज्ञानी मी होणार – प्रथम अनिशा नंदकुमार गवस आणि स्वराली गजानन गवस ( गेळे शाळा नं. १ ), व्दितीय हार्दिका लवू सातार्डेकर आणि वेदांत गोपाळ रेडकर ( मळेवाड शाळा नं. २ ), १८ ) समूहगान – प्रथम आजगाव शाळा नं. १, व्दितीय आंबेगाव शाळा नं. १, १९ ) समूहनृत्य – प्रथम ओटवणे शाळा नं. १, व्दितीय मळेवाड शाळा नं. २ असा आहे.