आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा सोमवार दि १३ जानेवारी रोजी  जत्रौत्सव 

0 minutes, 0 seconds Read

 

वैभववाडी (तुषार शिंगाडे )

आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा सोमवार दि १३ जानेवारी रोजी  जत्रौत्सव 

वैभववाडी -अचिर्णे गावच ग्रामदैवत श्री रासाई देवीचा जत्रोत्सव सोमवार दिनांक १३ जानेवारी ला होत आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री रासाई देवीची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला संपन्न होते. याहीवर्षी सोमवारी १३ जानेवारी ला देवीचा जत्रोत्सव होत आहे. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमासहित रक्तदान शिबिर,जिल्हा स्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, खेळ पैठणी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

जत्रोत्सवाच्या सकाळी ९.३० वा. देवीची विधीवत महापूजा व महाआरती होणार आहे. त्याचवेळी मंदिराशेजारील मंडपात सकाळी ९.३० ते दुपारी १२. वा. पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ करण्यात येणार आहे. पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी १.३० वाजता देवींची ओटी भरणे, नवस बोलणे- फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महिलांसाठी “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित केला आहे या खेळातील विजेत्या व उपविजेत्या महिलांना पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच अंतिम १० स्पर्धकांना आकर्षक साठी भेट देण्यात येणार आहे.

सायंकाळच्या सत्रात ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. त्यानंतर रात्री ११ वाजता देवीची पालखी मिरवणूक, रात्रौ १२ वाजता दशावतार नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अचिर्णे व सरपंच ग्रा.पं. आचिर्णे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *