महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा विजय निश्चित – परशुराम उपरकर

देवगड (प्रतिनिधी)

 

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा विजय निश्चित – परशुराम उपरकर

स्वतःची प्रसिद्धी मिळविणे व दुसऱ्यावर टीका करणे एवढेच काम कणकवली विधानसभा मतदार संघाच्या आमदारांचे असून या पूर्वी त्यांचा शिवसेनेत लवलेशही नव्हता निव्वळ वडिलांच्या प्रेमापोटी त्यांना येथील जनतेने निवडून दिले .तीच जनता आता येथील आमदारांना कंटाळली आहे.पैशाने प्रवेश होत असले तरी जुने सैनिक व मनसे मधील कार्यकर्ते ही या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार संदेश पारकर यांच्या पाठीशी आहेत.त्यामुळे या निवडणुकीत संदेश पारकर यांचा विजय निश्चित आहे.असा आत्मविश्वास शिवसेना नेते माजी.आम.परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
या यावेळी नगरसेवक बुवा तारी, दिनेश पारकर, नगरसेवक तेजस मामघाडी, लक्ष्मण तारी आदी उपस्थित होते .

यावेळी पुढे बोलताना जिजी उपरकर म्हणाले की ,माजी आम.कै आप्पासाहेब गोगटे यांच्या समवेत आपण काम केले आहे.सुसंस्कृत आम.म्हणून ओळख असलेले आमदार एकटे गाडीतून फिरत असत याउलट वडिलांच्या जीवावर निवडून आलेले आमदार बॉडीगार्ड घेऊन फिरत आहेत.बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्यावेळी विरोध करणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडला .याना निवडून न देता संदेश पारकर सारख्या सर्वसामान्य नेतृत्वाला निवडून द्या.शिवाजी महाराज पुतळा पडल्या प्रकरणी निषेध केलेला नाही अथवा साधी चौकशीची कारवाईची मागणी केलेली नाही,.अनेक घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे.पंतप्रधान आवास योजनेचे काम रेंगाळले असून त्याचा मक्ता भाजप पदाधिकारी यांनी दिला आहे ११००/-रु चा मक्ता २६००/-रु एवढा वाढवून दिला आहे .देवगड मधील उपजिल्हारुग्णालय काम शिवसेनेचे आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी शिवसेनेच्या सत्तेत झाले आहे.त्याचे श्रेय आमदार घेत आहेत.महात्मा फुले योजना बंद केली ही यांची कामे असल्याचे नमूद केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *