देवगड (प्रतिनिधी) दि.१६ ऑगस्ट २०२४
सुर्वे बंधू,गोठणे यांच्यावतीने जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सुर्वे बंधू,गोठणे यांच्या वतीने दिनांक १५.०८.२०२४ रोजी खुडी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खुडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री.गणेश सुर्वे,माजी उप सभापती श्री.परूळेकर सर,श्री.शशिकांत परब,श्री.राजू जगताप, श्री.सुरेश साटम,श्री.संजय साटम, श्री.विजय परब, श्री.संतोष अडुळकर, श्री.आदेश परब,तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका -सौ.विनिता दुखंडे मॅडम,खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सायली गोरे मॅडम,
खुडी सरपंच-श्री.दिपक कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-श्री.निलेश कामतेकर, शा.व्य.स. उपाध्यक्षा सौ.आरेकर मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सौ.स्मिता कदम मॅडम, सौ.ओगले मॅडम,श्री.योगेश पाटील सर,श्री.विजय माने सर, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग,उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अजय जोईल व मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.योगेश पाटील यांनी केले .
सुर्वे बंधू यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल व दातृत्वाच्या भावनेबद्दल खुडी गावचे सरपंच श्री.दिपक कदम तसेच माजी सरपंच श्री.संजय जोईल यांनी गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खुडी शाळा व खुडी हायस्कूल तसेच संपुर्ण गावाच्या वतीने आभार मानले.
