सावंतवाडी – प्रतिनिधी
ताफा मंत्री केसरकरांचा,गाड्या बंद पडल्या पोलिसांच्या,ट्राफिक जामने वांदा झाला जनतेचा
मंत्री महोदय म्हटलं की प्रशासकीय गाड्यांचा ताफा,मंत्र्यांच्या संरक्षण करिता पोलिसांचा फौज फाटा हा आलाच.पण य़ा सर्वांमुळे सर्व सामन्या जनता आणि वाहन चालक याना कसा नाहक त्रास होतो याचा प्रत्येय आज सावंतवाडी येथे आला.राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आपल्या सावंतवाडी येथील एस टी स्टँड समोरील कार्यालयात आले असता त्यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमुळे तब्बल 15 ते 20 मिनिटं ट्रॅफिक जाम झाले होते.
मंत्री केसरकर यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक गाडी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केली होती.आणि पोलिसांची दुसरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क केली होती.यामुळे वाहतूक कोंडी झाली.ज्या पोलिसांच्या गाडीमुळे वाहतूक कोंडी झाली होती त्या गाडीतील मंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहतुकीची कोंडी झाली असता मंत्र्यांच्या कार्यालय बाहेर उभे राहून बघ्याची भूमिका करत होते.यावाहतूक कोंडीबाबत पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांची सदर गाडी ब्रेक फेल असल्याची माहिती दिली एका पोलिसाने गाडीला स्टार्टर प्रॉब्लेम असल्याचे सांगितले.
मात्र अशी नादुरुस्त गाडी रस्त्यावर उभी करून वाहतुकीची कोंडी करणं पोलिसांन शोभत का? असा प्रश्न सर्वसामान्य चालकांमधून उपस्थित केला. पोलिसांची गाडी चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याची माहिती वाहतूक पोलीस सुनील नाईक याना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी येत पोलिसांची बंद पडलेली गाडी उपस्थितांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करत वाहन चालकांची वाहतूक कोंडी मुळे होणारी गैरसोय दूर केल्याने नाईक यांच्या कर्तव्य दक्षतेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
पोलिसांनी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीमुळे झालेली वाहतूक कोंडी पाहून पोलिसांचं नियम तोडत असतील तर कायदा फक्त सर्वसामान्य जनतेने पाळायचा का?असा प्रश्न पडला असून मंत्री केसरकर यांच्या ताफ्यातील य़ा गाडीमुळे झालेल्या वाहतूक कोंडी मुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
