आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार
युवासेना उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर सह असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश
कणकवली तालुक्यातील माईन येथील सामाजिक कार्यकर्ता, बिडवाडी युवासेना जि. प. उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर व माईन येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला भाजपचे प्रवक्ते आणि कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सर्व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेत भाजपमध्ये स्वागत केले. माईण येथे हा जाहीर पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशामुळे बिडवाडी भरणी, माईन या भागात उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला आहे.
या प्रवेशावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राजू हीर्लेकर, संदीप सावंत,हेमंत देसाई, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.