कणकवली दि ३ ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर)
भाजपा पुरस्कृत नगरपंचायत पथविक्रेता समिती सदस्यांचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते सत्कार
कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत ८ पैकी ७ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार बिनविरोध निवडून आले. आमदार नितेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कंझ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीच्या निवडणूक साठी 27 सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या निवडणूक साठी एकूण 8 पैकी 7 जागांसाठी भाजपा पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 1 ऑक्टोबर होती. अनुसूचित जाती प्रवर्गामधील उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे ती जागा रिक्त राहिली आहे. एकूण 193 मतदार असून भाजपाचे सर्वच्या
सर्व सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सागर होडावडेकर, हरेश ढवण, संजय परब, हनुमंत पेंडूरकर, सानवी गावडे, शबिना दोडमनी, सूर्यकांत ठाकर हे भाजपा पुरस्कृत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संदीप नलावडे, सागर होडावडेकर यांनी मेहनत घेतली. या निवडणुकीसाठी देवगड जामसंडे नगरपंचायत चे मुख्याधिकारी कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
