जनावरांचे हायवेवर होणारे अपघात रोखण्यासाठी वागले ग्रामपंचायत कडून रेडियम बेल्ट ; शेतकऱ्यांनी केले वागदे ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक 

0 minutes, 0 seconds Read

कणकवली दि ३ ऑक्टोबर(तुळशीदास कुडतरकर )

जनावरांचे हायवेवर होणारे अपघात रोखण्यासाठी वागले ग्रामपंचायत कडून रेडियम बेल्ट ; शेतकऱ्यांनी केले वागदे ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक 

महामार्गावर अचानक जनावरे आडवी आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पत्रकार गिरीश परब यांच्या संकल्पनेतून अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. वागदे ग्रामपंचायतचे सहकार्य घेऊन मुंबई – गोवा महामार्गालगत असलेल्या जनावरांना रेडीयम बेल्टचे वाटप करण्यात आले. जेणेकरून हायवेवरून जाताना वाहन चालकांना लांबूनच रेडीयम दिसेल आणि अपघात टाळण्यासाठी त्याची मदत होईल.

वागदे गावातील शेतकऱ्यांकडून वागदे ग्रामपंचायतने राबविलेल्या अपघात रोखण्यासाठीच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत, ग्रामसेवक युवराज बोराडे,श्रीधर घाडीगावकर,दीपक कदम, सुनील गोसावी आदि वागदे गावातील शेतकरी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *