गोवळ धनगरवाडी येथील उबाठाचे कार्यकर्ते भाजपात ; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश वर केला भाजपा पक्षात प्रवेश

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

गोवळ धनगरवाडी येथील उबाठाचे कार्यकर्ते भाजपात ; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश वर केला भाजपा पक्षात प्रवेश

देवगड मधील गोवळ धनगरवाडी येथील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
उबाठा मधून भाजपामध्ये होणारी आवक उबाठाला धडकी बनवणारी असून देवगड मधून उबाठा सेना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे .

प्रवेश केलेल्यांमध्ये दिनेश कोकरे, संजय कोकरे, सुनील कोकरे, राजेंद्र कोकरे, विंजू जंगले, विष्णू शेळके, तुकाराम कोकरे यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे . आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्याचा जो कायापालट केला आहे. यामध्ये आमचा गोवळ परिसर हवा असेल तर आम्हाला आमदार नितेश राणे यांचे नेतृत्वाखाली काम करावे लागेल हे लक्षात आल्याने आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे असे प्रवेश करताना सांगितले.

यावेळी उपस्थित पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंडू नारकर, सत्यवान जंगले,राजू जठार, गोविंद कोकरे, महेश पडवळ आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *