डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातील 21 ज्युदोपट्टुंची निवड
कणकवली दि ३ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आयोजित५१ वी राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर गटाची जिल्हा निवड चाचणी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे आयोजित करण्यात आली होती.
या निवड चाचणीला जिल्हाभरातून 50 पेक्षा अधिक खेळाडूंनी हजेरी लावली होती. ही स्पर्धा असोसिएशनचे जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड व अभिजीत शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर पंच म्हणून अजिंक्य पोफळे व सोनू जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
जिल्हास्तरीय ज्युदो निवड चाचणीचा निकाल पुढीलप्रमाणे-
कॅडेट मुले-
५०कि.ग्रॅ.वजनाखालील गटात
प्रथम-स्वराज गवळी( सावंतवाडी ), द्वितीय -विश्वास चव्हाण ( कासार्डे), तृतीय-दुर्वास संजय पवार (कासार्डे)व तेजस संतोष पारकर (फोंडाघाट)
५५कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम – अनिकेत कुलम (आंबोली पब्लिक), द्वितीय -मॅथ्यू रोड्रिक्स (आंबोली सैनिक)
६०कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम- अविराज प्रसाद, द्वितीय -युवराज मलिक, तृतीय -यश धुरी (सर्व आंबोली पब्लिक)
६६कि.ग्रॅ.वजनाखालील गटात –
प्रथम-ईशांत शिंदे (आंबोली सैनिक) , द्वितीय- समर्थ लाडेगावकर (आंबोली सैनिक), तृतीय -रितेश साळवी (आंबोली पब्लिक) व आकाश गोंधळी (फोंडाघाट)
७३कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम- करण यादव (आंबोली सैनिक), श्रीगणेश चव्हाण (आंबोली सैनिक ),अनिकेत देसाई (आंबोली पब्लिक)
८१कि.ग्रॅ.वजनाखालील गटात –
प्रथम-आर्यन कोरगावकर (आंबोली सैनिक), द्वितीय -सिद्धार्थ सास्मल (आंबोली सैनिक)
९०कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम -सोहम कारेकर (सावंतवाडी)
९०कि.ग्रॅ.वजनावरील गटात-
प्रथम -सतीश रोट्टी (आंबोली पब्लिक)
कॅडेट मुली-
४०कि.ग्रॅ.वजनखालील गटात-
प्रथम – राहीन करोल (सावंतवाडी), द्वितीय -तन्वी पारकर (फोंडाघाट)
४४कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम- रिद्धी परब (कासार्डे)
४८कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-अक्षता कोकरे (कासार्डे)
५२कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-साक्षी तेली (कासार्डे)
५७कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम- रूपाली कोकरे (कासार्डे)
७०कि.ग्रॅ.वजनावरील गटात-
प्रथम -मंथली मुणगेकर (कासार्डे)
ज्युनियर मुले
५५कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-तेजसराव दळवी ( सावंतवाडी)
६०कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-संभाजी पाचंगे (फोंडाघाट),यश धुरी(आंबोली सैनिक)
६६कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम -समर्थ लाडेगावकर (आंबोली सैनिक), द्वितीय -आर्यन घाडगे (आंबोली पब्लिक),
७३कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-श्री गणेश चव्हाण (आंबोली सैनिक)
८१कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम- सिद्धार्थ सास्मल(आंबोली सैनिक)
ज्युनियर्स मुले
४४कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-पल्लवी शिंदे ( फोंडाघाट)
४८कि.ग्रॅ.वजनाखालील गटात-
प्रथम-कस्तुरी तिरोडकर ( फोंडाघाट)
यांनी यश संपादन केले आहे.
या यशस्वी ज्युदोपट्टूंमधून प्रत्येक वजनी गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या खेळाडूची डेरवण (जि.रत्नागिरी) क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्यावतीने दि. ४,५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ५१ वी राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनियर्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २१ खेळाडूंची निवड झाली असून ते आपापल्या वजन गटातून राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
या यशस्वी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, प्रशिक्षक आणि पदाधिकारी अभिजीत शेट्ये कोच-सोनू जाधव,दिनेश जाधव,अजिंक्य पोफळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आज दि. ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरीला रवाना झाली.
