बांदा (प्रतिनिधी)
हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षिका सौ अनुराधा अच्युत पिळणकर यांचे निधन
विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ अनुराधा अच्युत पिळणकर वय 72 वर्षे यांचे आज बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
आपले ज्ञान नानांचे कार्य त्याने जयगड जिल्हा रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदुरा बाबरवाडी शाळा तसेच शिरले शाळा यामध्ये उत्तम कार्य केले त्यांचे कार्य बघून त्या वेळेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी हवालदार दीक्षित गडकर यांनी त्यांचे कौतुकही केले होते एका दूरघआजारातही त्यांनी ज्ञानदानाचे उत्तम कार्य केले होते. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी हवालदार दीक्षित गडकर यांनी त्यांचे विशेष असे कौतुक केले होते त्यांच्या कार्याचा गौरवही केला.
ज्ञानदान करताना त्यांनी कार्यानुभव संगीत शालेय शिक्षण मराठी इंग्रजी या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांची गणना झाली होती. जुन्या काळातील शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे लोक आजही पाहत होते सेवानिवृत्तीच्या पूर्वी त्याने डेगवे येथील शाळेत ज्ञानदानाचे कार्य केले.
त्यांच्या पश्चात पती अच्युत पिळणकर तीन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे खेमराज मेमोरियल स्कूल बांदा चे माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर यांच्या त्या पत्नी होय.
