कणकवली दि २ ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर)
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम साजरा
सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचे आयोजन
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सामाजिक वनिकरण यांच्या माध्यमातून एक पेड माँ के नाम हा वृक्ष लागवडीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 900 रोपे आईच्या नावे लागवडीसाठी देण्यात आली पर्यावरण व स्वच्छता प्रमुख प्रसाद राणे सरांनी वृक्ष लागवडीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. आई जसे लहान मुलांचे मायेने संगोपन करून लहानाचे मोठे करते त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षांची जोपासना करून झाड मोठे करावे आणि आईजसे संपूर्ण कुंटुंबांचा आधार बनते त्याच प्रमाणे तुम्ही लावलेले झाड पर्यावरणाचा आणि निसर्गाचा आधार बनावे.
हरितसेना प्रमुख संदिप नागभिडकर यांनी वृक्ष लागवडीचे फायदे कथन केले मुख्याध्यापक पिराजी कांबळे सरांनी वृक्षांचे पर्यावरण जोपासण्यासाठी महत्व सांगून वृक्ष लागवड कशी करावी या विषयी मार्गदर्शन केले.
पर्यवेक्षिका वृषाली जाधव यांनी वृक्ष लागवडीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक वनिकरणांचे प्रमुख अनिल पाटील साहेब यांनी प्रशालेला रोपे देवून उपकृत केले आणि वनिकरण वाढविण्यासाठी विद्यार्थी वर्गांनी सहभाग घेतला तरच पर्यावरण व निर्सग वाचू शकेल.यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
