तळेरे ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पोलिस पाटलांचा जाहीर सत्कार

 

कणकवली दि २४ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)

 

तळेरे ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पोलिस पाटलांचा जाहीर सत्कार

 

 

तळेरे गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील चंद्रकांत जाधव व औदुंबरनगरच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ.श्रेया जंगले तसेच तसेच बरीच वर्ष तळेरे गावचे प्रभारी पोलीस पाटील म्हणून चांगली कामगिरी करणारे दारुम गावचे पोलीस पाटील संजय बिळसकर आणि “माझी लाडकी बहीण” या योजनेला मोलाचे सहकार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ.मिताली वळंजू , श्रीमती नेहा वायंगणकर, सौ.स्मिता कोळेकर या सर्वांचा तळेरे ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या सर्वांना तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ.रिया चव्हाण ग्रामसेविका सौ.राजलक्ष्मी जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश सोरप आणि ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *