आरटीओ कर्मचारी काम बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी 

 

आरटीओ कर्मचारी काम बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद

 

मोटार वाहन विभाग (आर टी ओ ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी फुकारलेल्या काम बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
सिंधुदुर्गच्या उप प्रादेशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज लिपिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले.आज राज्यभरतील मोटार वाहन विभाग (आर टी ओ )कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर काम बंद आंदोलन फुकारले होते.त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

शासनाकडे विविध मागण्यासाठी निवेदन दिले असून अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने हा बंद फुकारण्यात आल्याची माहिती सुनील खांदारे ,सहसचिव मोटार वाहन विभाग (आर टी ओ ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिली.य़ा काम बंद आंदोलनात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग राज्य ,मंगेश गायकवाड ,शशांक केणी ,वन्दिता पांचाळ ,गणेश कोळी ,सुरेश मानगुलकर, मनोहर जाधव आदी उपस्थित होते.लिपिक वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज काही अंशी ठप्प होते.

शासनाने महसूल निहाय बदली बाबत घेतलेला निर्णय योग्य आहे मात्र त्याला राज्य भरात विरोध असल्याने कोकण विभागातील प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनाही विरोध करावा लागत आहे अशी माहिती मिळत आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *