कणकवली दि.२१ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)
ओसरगाव जि.प.शाळा नंबर १ च्या वतीने ओसरगाव तलाव परिसराची स्वच्छता !
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ओसरगाव नंबर 1 च्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ” स्वच्छ भारत पंधरवडा” आढवडा सप्ताह साजरा करत आहे. या निमित्ताने शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता ओसरगाव तलाव परिसरात शालेय विद्यार्थी, पालक ,शिक्षक यांच्या वतीने सफाई करत, तलाव परिसर स्वच्छ केली.
यावेळी ओसरगाव उपसरपंच गुरुदास सावंत, मुख्याध्यापक किशोर कदम, ग्रामसेवक श्री.तळवडेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश अपराज, सुरज कदम , सह शालेय विद्यार्थी , शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ होते.
ओसरगाव जि.प. शाळा नंबर 1 च्या शालेय विद्यार्थ्यां शिक्षक आणि पालकांनी मिळून ओसरगाव तलाव परिसरात स्वच्छता अभिविण्यात आली असल्याने ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थी शिक्षक पालकांचे कौतुक केले जात आहे.
